नवीन शासन निर्णयानुसार राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेमध्ये नेमका कोणता बदल केला आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो हा बदल योजनेतील अर्ज प्रक्रिया सुधारली जावी आणि गैरप्रकार कमी व्हावे त्यासाठी करण्यात आला आहे. अर्ज मंजूर करताना फसवणूक टाळली जावी यासाठी राज्य सरकारने हा बदल केला आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर.
यापूर्वी मित्रांनो अर्ज मंजूर करण्याचे काम 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते ज्यात अंगणवाडी सेविका,CRP, ASHA सेविका, व इतर समाविष्ट होते. परंतु आता हे काम फक्त अंगणवाडी सेविकालाच करता येणार आहे. अर्ज मंजूर करताना गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने हे काम अंगणवाडी सेविकांपाशी सोपविले आहे.
आता नवीन शासन निर्णयानुसार अर्ज मंजूर करण्याचे काम फक्त अंगणवाडी सेविका यांनाच करता येणार आहे.
Table of Contents
सरकारने हा निर्णय का घेतला?
मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या एका गैरप्रकारामुळे हा निर्णय सरकारने घेतला आहे आणि तो गैरप्रकार म्हणजेच एका व्यक्तीने तिच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचा प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये घडला आणि त्यापैकी 26 अर्ज मंजूरही झाले. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेत पुन्हा असे गैरप्रकार होऊ नयेत त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे आणि आता सप्टेंबरमधील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकास मंजुरी देऊ शकतात बाकी कोणीही नाही.
Ladki Bahin Yojana FAQ’S:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक योजना आहे ज्या योजनेद्वारे महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेची अंमलबजावणी कधी सुरू झाली?
या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झालेली आहे.
योजनेचे अर्ज मंजूर करण्याची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे?
नवीन शासन निर्णयानुसार अर्ज मंजूर करण्याची जबाबदारी केवळ अंगणवाडी सेविकांकडे असेल.
आतापर्यंत अर्ज मंजूर करणारे कोण होते?
यापूर्वी अर्ज मंजूर करण्याचे काम 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते, ज्यात अंगणवाडी सेविका, CRP, ASHA सेविका, व इतर समाविष्ट होते.
शासनाने अर्ज मंजूर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची निवड का केली?
अर्ज मंजूर करताना गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांची निवड अर्ज मंजूर करण्यासाठी केली आहे.
आतापर्यंत किती महिलांना योजनेतून आर्थिक सहाय्य मिळाले आहे.
जुलै आणि ऑगस्ट 2024 मध्ये 1 कोटी 59 लाख महिलांना ₹4787 कोटींचा लाभ दिला गेला आहे.
अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया आणखी कोणत्या तारखेपर्यंत चालू राहणार आहे?
अर्ज करण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना किती आर्थिक सहाय्य दिले जाते?
पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते.
या योजनेतील बदलांमुळे कोणता फायदा होणार आहे?
या योजनेतील बदलांमुळे अर्ज मंजूर करण्याचे प्रक्रिया सुधारली जाऊन गैरप्रकार कमी होईल अशी अपेक्षा आहे.
सरकारच्या या ताज्या निर्णयामुळे काय होईल?
सरकारच्या या निर्णयामुळे अर्ज मंजूर करताना फसवणूक टाळली जाऊन, अर्ज प्रक्रिया पारदर्शक होईल.