आता केंद्र सरकार देशातील महिलांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांचे अनुदान देऊन सिलेंडर देखील देत आहे. आपल्याला माहित आहे की गॅस सिलेंडर 803 रुपयाला मिळत आहे.आणि आता केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना गॅस सिलेंडर वर सूट देण्याचा निर्णयही घेतला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्याद्वारे राज्य सरकार दर महिन्याला गरीब महिलांना दीड हजार रुपये देत आहे. त्याचप्रमाणे आता गरीब महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षभर मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार असे आवाहन केले आहे. आणि याची अंमलबजावणी देखील लवकरच करण्यात येणार आहे. व तसेच राज्य सरकारने अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाद्वारे आदेशही दिली आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार??
या योजनेअंतर्गत राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार गॅस कनेक्शन ज्यांच्या नावावर आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्याशिवाय या योजनेचा लाभ कुटुंबातील एका सदस्यालाच देण्यात येणार असे सरकारने ठरवले आहे. आणि तसेच राज्य सरकार या लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करणार आहे आणि ही रक्कम सरकारच्या तीनशे रुपयांच्या अनुदानाव्यतिरिक्त असणार आहे. तसेच या योजनेचा लाभ एक जुलै 2024 नंतर जारी झालेल्या शिधापत्रिकाधारकांना मिळणार नाही.
केंद्र सरकारने ही योजना गरीब महिलांना 300 रुपये अनुदान पुढील आठ महिने म्हणजेच 31 मार्च 2025 पर्यंत सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. ही योजना 2016 सली सुरू करण्यात आली असून आतापर्यंत देशभरातील नऊ कोटी त्याहूनही अधिक महिलांनी या योजनेत नोंदणी केली आहे व त्यांना प्रति सिलेंडर 300 रुपये अनुदानही मिळत आहे.
हे पण वाचा: