मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवले जातात. आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम म्हणजे एकूण 34 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत आणि याच प्रमाणे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील फार फार महत्त्वाची योजना आहे. पी एम किसा मानधन योजनेत अंतर्गत वयाच्या साठ वर्षानंतर शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे या योजनेविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. ही योजना नेमकी काय आहे?व त्यासाठी लागू असलेल्या अटी कोणकोणत्या आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय करावे लागेल या सर्वांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पीएम किसान मानधन योजना नेमकी आहे तरी काय?
पीएम किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे. ही योजना ऐच्छिक असून या योजनेत शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात आणि वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये मिळतात. या योजनेसाठी मोफत ही नोंदणी करता येते तर मोफत नोंदणीही नागरी सुविधा केंद्रातून आणि राज्य नोडेल ऑफिसर यांच्याकडून आपण या योजनेसाठी मोफत नोंदणी करू शकता.
या योजनेचे काम नेमके कोणत्या प्रकारे पार पडते?
मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान वय असणे आवश्यक आहे. म्हणजेच 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान वय असणाऱ्या शेतकऱ्यांना साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत 55 ते 200 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. आणि केंद्र सरकार देखील या योजनेत शेतकऱ्यांच्या सोबत पैसे जमा करेल.
अर्ज करताय…..तर थांबा?
तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायला करायचा असेल तर त्यासाठी काही अटी आहेत त्या तीन मधील एक अट म्हणजेच अर्ज करण्याला शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणं आवश्यक आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजेच शासकीय आकडेवारीनुसार या योजनेसाठी तब्बल वीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
1. पीएम किसान मानधन योजना नेमकी काय आहे?
पी एम किसान मानधन योजना म्हणजे वयाच्या साठ वर्षानंतर शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन देणारी ही योजना आहे.
2. या योजनेतून किती पेन्शन मिळेल?
शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळेल.
3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किती प्रीमियम भरावे लागेल?
शेतकऱ्यांना पंचावन्न ते दोनशे रुपये प्रीमियम भरावे लागेल आणि यामध्ये केंद्र सरकार देखील सहाय्य करेल.
4. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो पात्रता काय आहे?
18 ते 40 वर्षे वय असलेल्या शेतकऱ्यांना 55 ते दोनशे रुपये प्रीमियम भरून या योजनेचा लाभ घेता येईल तसेच त्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असावी.
5. या योजनेसाठी नोंदणी कशी करता येईल?
नागरी सुरक्षा केंद्रातून किंवा राज्य मॉडेल ऑफिसर यांच्याकडून मोफत नोंदणी करता येणार आहे.
6. पी एम किसान मानधन योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत घेतला आहे?
शासकीय आकडेवारीनुसार वीस लाखनहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.
7.पीएम किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता कधी मिळेल?
पी एम किसान सन्मान योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जाण्याची शक्यता आहे.
8.या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या वयातील शेतकरी पात्र आहेत?
18 ते 40 वर्ष वय असलेले शेतकरी पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.